Pimpalner Accident  Saam tv
महाराष्ट्र

Pimpalner Accident : भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन युवकांचा जागीच मृत्यू

Dhule News : पिंपळनेर- सटाणा या रस्त्यावर हा भीषण अपघात १४ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास घडला. कार चालक पिंपळनेरहून सटाण्याकडे जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव जात होता

Rajesh Sonwane

पिंपळनेर (धुळे) : खराब रास्ता असताना देखील कार भरधाव वेगाने चालवत असताना, कार अनियंत्रित झाली. यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवर असलेल्या तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पिंपळनेर- सटाणा या रस्त्यावर हा भीषण अपघात १४ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास घडला. कार चालक पिंपळनेरहून सटाण्याकडे जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव जात होता. यातच त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार (Accident) धडक दिली. यात पिंपळनेरमधील रामनगरमधील रहिवासी राहुल गुलाब लाडे (वय २२) व लोकेश चंद्रकांत जाधव (वय २०) यांचा मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

अन्य एक जखमी 

सदर अपघातात जय पद्माकर सोनवणे (वय २२) हे देखील गंभीर जखमी झाला असून त्याला धुळे येथे हलविण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू आणि अपघाताची माहिती न देता कारचालक वाहन जागेवर सोडून पळून गेला. या कार चालकाविरुद्ध पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT