Dhule Accident Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस पाटलाचा मृत्यू; पुलावरील खड्ड्यामुळे अपघात

Dhule news : धुळे तालुक्यातील बाळापूर- फागणे गावालगतच्या पुलावर हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की अपघातात दुचाकी वाहनाचा पुर्णतः चेंदामेंदा झाला आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील बाळापुर व फागणे गावालगत असलेल्या कोती नाला पूल व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोटारसायकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात हा पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

धुळे (Dhule) तालुक्यातील बाळापूर- फागणे गावालगतच्या पुलावर हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की अपघातात दुचाकी वाहनाचा पुर्णतः चेंदामेंदा झाला आहे. दरम्यान अपघातात मृत झालेल्या इसमाचा मृतदेह बराच वेळ रस्त्यावर तसाच पडून असल्यामुळे (Accident) परिसरातील नागरिकांनी या संदर्भात प्रशासनाला माहिती दिली. यानंतर देखील प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी फिरकला नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. अखेर स्थानिकांच्या मदतीने ॲम्बुलन्स बोलावून संबंधित मृत व्यक्तीचा मृतदेह हा ॲम्बुलन्स मध्ये टाकून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे,

संबंधित मृत व्यक्ती हा पोलीस पाटील असल्याची माहिती मिळाली असून, हा अपघात खड्ड्यांमुळेच झाला असावा असा अंदाज स्थानिकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य पसरल असून यापूर्वी देखील या खड्ड्यांमुळे पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. हा अपघात खड्ड्यांमुळेच झाला असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पुलावरील हे खड्डे प्रशासनातर्फे तात्काळ बुजविण्यात यावे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील स्थानिकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Maharashtra News Live Update:घोडबंदर रोडवरील काँक्रिटीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 25 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

SCROLL FOR NEXT