Dhule Accident News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Accident News: बसची जोरदार धडक; दोघांचा मृत्‍यू, दुचाकीचा चक्‍काचूर

बसची जोरदार धडक; दोघांचा मृत्‍यू, दुचाकीचा चक्‍काचूर

साम टिव्ही ब्युरो

बभळाज (धुळे) : शिरपूर– चोपडा रस्त्यावर तरडी ते बभळाज गावादरम्यान गुजरातमधील परिवहनच्या बसने धडक (Accident) दिल्याने तरडी (ता. शिरपूर) येथील दुचाकीवरील (Shirpur) दोघे ठार झाले. हा अपघात १० मे रोजी रात्रीच्या सुमारास घडला. याबाबत थाळनेर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Live Marathi News)

तरडी (ता. शिरपूर) येथील रहिवासी असलेले भागवत कालिदास पाटील (वय ४५) व विलास मंगल पाटील (वय ४०) हे दोन्ही तरूण रात्री ८ ते ९ च्या सुमारास दुचाकीने बभळाजकडून तरडीकडे जात होते. या दरम्‍यान समोरून येणाऱ्या गुजरात परिवहनच्या चोपडा- अहमदाबाद बसने तरडी ते बभळाज गावाच्या दरम्यान दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की अपघातात दुचाकीचा चक्काचूर होऊन दोन्ही तरूण गंभीर जखमी झाले.

अपघाताचे वृत्त समजताच तरडी व बभळाज येथील नागरिकांनी धाव घेत जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती थाळनेर (Police) पोलिसांना कळताच पोलिस अधिकारी सहकाऱ्यांसह दाखल झाले. दोन्ही तरूणांच्‍या अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT