Dhule Diesel Tanker Accident Saam TV
महाराष्ट्र

Dhule Diesel Tanker Accident: धुळ्यात डिझेलनं भरलेला टँकर उलटला; मदत करण्याऐवजी इंधन लुटायला लोकांची झुंबड

टँकर पलटी झाल्याने संपूर्ण पेट्रोल रस्त्यावर सांडलं आहे. हे डिझेल पाहूण नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली.

Ruchika Jadhav

Dhule Accident News: धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर डिझेलचा टँकर भररस्त्यात पलटी झाला आहे. टँकर पलटी झाल्याने संपूर्ण डिझेल रस्त्यावर सांडलं आहे. हे डिझेल पाहूण नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली. (Latest Marathi News)

पलटी झालेल्या डिझेलच्या टँकरमधून पडणारे डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. मिळेल त्या भांड्यात आणि कॅनमध्ये परिसरातील नागरिकांनी डिझेल भरून नेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईकडून इंदोरकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा डिझेल टँकर पलटी झाला आहे. या दुर्घटनेत टँकर चालक जखमी झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच उपस्थित नागरिकांना बाजूला करत मोठी दुर्घटना टाळण्यासाठी आपले कार्य सुरु केले आहे.

सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भीडल्या आहेत. महागाईने त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी हे डिझेल मिळेल त्या भांड्यात भरण्यास सुरुवात केली आहे. याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेत. सध्या हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Sambhajinagar : इतिहास प्रेमींसाठी पर्वणी! अजिंठा-सातमाळा रांगांतील ऐतिहासिक किल्ला, संभाजीनगरला गेल्यावर नक्की पाहा

Congress: मोठी बातमी! महाराष्ट्र काँग्रेसचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड

नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला किती कोटी मिळणार? उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला अटक

BP - Diabetes : कडक उन्हामुळे वाढते BP अन् शुगर; कुणाला सर्वाधिक धोका?

SCROLL FOR NEXT