Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : पार्किंगचे पैसे न दिल्याने मोटरसायकलवरील महिलेची ओढणी ओढली; रामलिंग तीर्थक्षेत्र येथील धक्कादायक प्रकार

Dharashiv News : श्रावण महिना असल्याने येडशी येथील रामलिंग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राज्यभरातुन पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने येत असतात

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील येडशी येथील रामलिंग तीर्थक्षेत्राठीकाणी अनेक भाविक येत आहेत. येथे येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. गाडी पार्किंग करताना त्याचे पैसे द्यावे लागतात. मात्र पार्किंगचे पैसे दिले नाही म्हणून येथील ठेकेदाराने चक्क मोटारसायकलवर बसलेल्या महिलेची ओढणी ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

श्रावण महिना असल्याने येडशी येथील रामलिंग तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी (Dharashiv News) राज्यभरातुन पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने येत असतात. भाविकांची गर्दी अधिक होत असल्याने पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी येडशी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पार्कीगसाठी टेंडर काढण्यात आले आहे. मात्र पार्किंगचे टेंडर दिलेल्या ठेकेदाराचा मनमानी कारभार येथे नेहमीच पाहायला मिळतो. दरम्यान आज चक्क महिलेची ओढणी ओढल्याचा प्रकार समोर आला असल्याने या प्रकारामुळे भाविकांतुन मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गाडी पार्किंग केल्यानंतर पार्किंगचे पैसे दिले नाही म्हणून मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या महिलेची ओढणी ओढण्याचा धक्कादायक प्रकार येडशी येथील रामलिंग येथे घडल्याच समोर आला. यानंतर महिलेची ओढणी ओढल्यावरून वाद होऊन भांडण झाले. हे भांडण सोडणाऱ्या भाविकालाही मारहाण करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT