Tuljabhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : दिवाळी सुटीत तुळजाभवानी मंदीर संस्थानला मिळाले ७६ लाख उत्पन्न; भाविकांची अजूनही गर्दी

Dharashiv News : दिवाळी सुट्यांच्या कालावधीत महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. लाखो भाविक या काळात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येऊन गेले आहेत

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : दिवाळी सुट्या असल्याने अनेकजण तुळजाभवानी दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन भाविकांनी मंदिराच्या दानपेटीत रक्कम टाकली असून चार दिवसात तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या उत्पन्नात तब्बल ७५ लाख रुपयांची भर पडली आहे. यामध्ये सर्वांधीक ५४ लाख रुपये सशुल्क तसेच व्हीआयपी दर्शनातुन मिळाले आहेत.

सण उत्सव काळात अनेकजण (Dharashiv News) देवदर्शनाला जात असतात. यात दिवाळी उत्सवाच्या सुट्या असल्याने याची संधी साधत अनेकांना देवदर्शनाला लाभ घेताना. दरम्यान दिवाळी सुट्यांच्या कालावधीत महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या (Tuljabhavani Mandir) दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. लाखो भाविक या काळात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येऊन गेले आहेत. दर्शन घेण्यासोबतच काहींनी रोख रोख रक्कम स्वरूपात दान केले आहे. तर मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सुविधा असल्याने त्याचे शुल्क देखील मंदिर संस्थानला प्राप्त झाले आहे. 

दरम्यान २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान सलग चार दिवस तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये दररोज लाखावर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. तर यामध्ये ७६ लाख ५७ हजार २८२ रुपयांची भर पडली आहे. यात सर्वाधिक ५४ लाख रुपयांचे सशुल्क हे व्हीआयपी दर्शनातून मिळाले आहे. तर आगामी १० नोव्हेंबरपर्यंत तिर्थक्षेञ तुळजापूरात गर्दी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT