Tuljabhavani Devi Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Devi : तुळजाभवानी मातेच्या चरणी भरभरून दान; भाविकांकडून वर्षभरात १७ किलो सोनं, २५६ किलो चांदी अर्पण

Dharashiv News : दर्शनासाठी येणार भाविक मंदिरातील दानपेटीत रोख रक्कम स्वरूपात गुप्त दान करत असतात. तर काही भावीण श्रद्धेपोटी देवीच्या चरणी सोने- चांदीचे आभूषण अर्पण करत असतात

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी देवीवरील श्रध्देपोटी भाविकांकडून भरभरून दान देण्यात आले आहे. वेगवेगळ्या स्वरुपातील दान अर्पण करत सोने- चांदीच्या लहान मोठ्या वस्तु, रोख रक्कम मिळून साधारण ६० ते ७० कोटी रुपयांचे दान तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असलेले तुळजापूरची आई तुळजाभवानी मंदिर देवस्थान. याठिकाणी भाविक वर्षभर दर्शनासाठी येत असतात. प्रामख्याने नवरात्री उत्सव व चैत्रोत्सवात भाविकांची संख्या अधिक असते. दर्शनासाठी येणार भाविक मंदिरातील दानपेटीत रोख रक्कम स्वरूपात गुप्त दान करत असतात. तर काही भावीण श्रद्धेपोटी देवीच्या चरणी सोने- चांदीचे आभूषण अर्पण करत असतात.  

वर्षभरात ४८ कोटी ३२ लाख रुपयांचे गुप्त दान 

तुळजाभवानी मंदीरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दानपेट्या गुप्त दानपेटीतही भाविक दान करतात. त्यातुन गेल्या आर्थीक वर्षात तुळजाभवानी मातेच्या चरणी सुमारे ६५ ते ७० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. भाविकांनी एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या या दानात ४८ कोटी ३२ लाख २ हजार ९७३ रुपये रोख रकमेचा समावेश आहे. 

१७ किलो सोने, २५६ किलो चांदी 

रोख रक्कम तसेच गुप्त दान स्वरूपात दिलेल्या रक्कमेशिवाय काही भाविकांनी सोने चांदीचे दागिने तुळजाभवानी चरणी अर्पण करत असतात. त्यानुसार वर्षभरात १७ किलो ६२० ग्रॅम सोने आणि २५६ किलो चांदीचा समावेश आहे. याशिवाय अभिषेक पुजा, सिंहासन पुजेमधुनही मंदीर समितीला उत्पन्न मिळते. यामध्ये सशुल्क पासचीही व्यवस्था आहे. या सर्वांचे माध्यामातून हे दान करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vay Vandana Card: ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आरोग्य सुरक्षा कवच’; वय वंदना कार्डसाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

Nagpur : नामांकित कॉलेजचा बोगस जात प्रमाणपत्र घोटाळा उघड, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह ११ जणांवर गुन्हा; नागपुरात खळबळ

धक्कादायक! करोडपती होण्यासाठी मांडली तंत्र-मंत्राची पूजा; सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून पूजेला बसवलं

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

SCROLL FOR NEXT