Bird Flu Saam tv
महाराष्ट्र

Bird Flu : धाराशिवमध्ये बर्ड फ्लूचा एक संशयित?; तपासणीसाठी घेण्यात आला स्वॅब

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे बर्ड फ्ल्यूची लागण होऊन कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यानंतर आजूबाजूच्या परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यात बर्ड डब्ल्यूचा एक संशयित आढळून आल्याची माहिती असुन हा व्यक्ती ढोकी येथील असून त्याचा मांस विक्रीचा व्यवसाय आहे. तापाने फणफणलेल्या या व्यक्तीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर आजराचे समोर येणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे बर्ड फ्ल्यूची लागण होऊन कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यानंतर आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाले होते. आजूबाजूच्या परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. यानंतर आता एका व्यक्तीला अधिक ताप आल्याने सदर व्यक्तीला बर्ड फ्ल्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. 

खासगी रुग्णालयात उपचार सुरु 

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे एका मांस विक्री करणाऱ्या व्यक्तीमध्ये बर्ड फ्ल्यू झाल्याचे लक्षण आढळून आले आहेत. या व्यक्तीस तीव्र स्वरूपाचा ताप असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तपासणीसाठी नमुने घेतले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर व्यक्ती कोणता आजार आहे; हे स्पष्ट होणार आहे. 

परिसरात सर्वेक्षण सुरु 

ढोकी येथे कावळ्यांच्या मृत्यूमुळे बर्ड फ्लू आजार उघडकीस आला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने मृत कावळे आढळून येत असल्याने सध्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. यातच हा व्यक्ती संशयित सापडल्याने आरोग्य यंत्रणेची ही धाकधुक वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live Update : शिवसेनेत फूट पडली, हा निर्णय आयोगाने घेतला कसा? ठाकरेंच्या वकिलांचा कोर्टात सवाल

पुण्यात ब्रिटनहून आलेला 'तो' धर्मगुरू अन् चर्चमधील 'ते' रहस्यमय प्रवचन! नव्या कायद्यांतर्गत महाराष्ट्रातली पहिलीच मोठी कारवाई

Maharashtra News Live Update: केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक; दरात मोठी घसरण

Suvendu Adhikari: उड्डाण भरताच तांत्रिक बिघाड; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग

ना गाडी, ना ट्रेन...थेट १ हजार किलोमीटर पायी प्रवास! महाराष्ट्रातून निघालेल्या 'या' चाहत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT