Tanaji Sawant Saam tv
महाराष्ट्र

Tanaji Sawant : विकास न झालेलं गाव दाखवा आणि १ लाख मिळवा, तानाजी सावंतांचे मतदारांना चॅलेंज!

Dharashiv News : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. तर अर्ज माघारीनंतर प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात झाली असून यात उमेदवारांकडून मतदारांना आश्वासन दिले जातात. त्यानुसार मतदार संघातील विकास कामे न झालेले गाव दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा; असं थेट चॅलेंज आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मतदारांना दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) प्रत्येक मतदारसंघात लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. तर अर्ज माघारीनंतर प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसारच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरवात केली असून प्रचारादरम्यान त्यांनी थेट मतदारांना ओपन चॅलेंज दिले आहे. भूम परंडा विधानसभा मतदारसंघात सावंत यांची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटे यांच्याशी लढत आहे.

सर्वाधिक विकास कामे केल्याचा दावा 

गेल्या सात वर्षात सर्वाधिक विकास कामे केली. मतदारसंघात दीडशे ते दोनशे कोटी रुपये विकास निधी आणला; असा दावाही सावंत यांनी केला आहे. सावंत यांनी विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली असून त्यांचा गाव भेट दौरा सुरू आहे. या दौऱ्यात सावंत मतदारांना हे चॅलेंज देत आहेत. सावंत यांच्या या चॅलेंजची सध्या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीनं जिंकली नाणेफेक, गुजरातला दिलं फलंदाजीचं आमंत्रण

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीतून अभिमन्यू खोतकर यांची माघार

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा १५०० रुपये मिळणार? सुप्रिया सुळेंची फडणवीस सराकारकडे मोठी मागणी

Fort In Nashik : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

Monday Horoscope: कामाच्या ठिकाणी कौतुक होणार, ५ राशींचे बढतीचे योग आहेत; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT