Tuljabhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी देवीचे सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन; २२ जुलैपासुन मोबाईल ऍप होणार सुरू

Dharashiv News : महाराष्ट्राची कुळस्वमिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. दर्शन घेण्यासाठी बराच वेळ भाविकांना रांगेत उभे राहावे लागत असते

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी सशुल्क स्पेशल दर्शन पास मिळत असते. मात्र आता भाविकांना हि पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नसून मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने हि पास भाविकांना काढता येणार आहे. यासाठी मंदिर समितीने ऍप काढले आहे. 

महाराष्ट्राची कुळस्वमिनी (Tuljabhavani Mandir) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. दर्शन घेण्यासाठी बराच वेळ भाविकांना रांगेत उभे राहावे लागत असते. मात्र झटपट दर्शन घेण्यासाठी मंदिर समितीने दर्शन पासची सुविधा सुरु केली आहे. मंदिर परिसरातच हि पास भाविकांना ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध होत असते. मात्र आता भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने देखील भाविकांना पास काढता येणार आहे. यासाठी तुळजाभवानी मंदीर संस्थाने (Dharashiv News) एक ऍप तयार केले आहे.

२२ जुलैपासून सुरु होणार ऍप 

तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी भाविकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे घरबसल्या सशुल्क पास ५०० रुपये देणगी देऊन काढता येणार आहे. सशुल्क स्पेशल दर्शन पास हे मंदीर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीत ऑफलाईन पद्धतीने थेट जाऊन काढता येणार आहे. त्याचं बरोबर आता ही सुविधा ऑनलाईन देखील उपलब्ध असणार आहे. २२ जुलै सोमवारपासुन ऑनलाईन सुविधा मोबाईल ऍपवर सुरु होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT