Tuljabhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी; २६ पर्यंत करता येणार नोंदणी

Dharashiv News : महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : तुळजाभवानी देवीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते. ही सिंहासन पुजा करण्यासाठी भाविक प्रतीक्षेत असतात. दरम्यान या पूजेसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. संस्थांच्या संकेतस्थाळावरून हि नोंदणी करता येणार आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या (Tuljabhavani Mandir) दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. वर्षभर भाविकांची गर्दी असते. दरम्यान या कालावधीत देवीच्या सिहासनाची पूजा करण्यात येत असून देवीच्या सिंहासन पूजनासाठी भाविक प्रतीक्षेत असतात. यामुळे मंदिर संस्थानने नोंदणी सुरु केली आहे. 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिंहासन पुजा नोंदणी आजपासून म्हणजे २१ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आली असून ती २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. त्यामुळे भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT