Tuljabhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Dharashiv News : दिवाळी व सणाची सुट्टी सुरू झाल्यानंतर तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली होती

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : तीर्थस्थळी जाऊन देवदर्शन करण्यासोबतच भाविक मंदिरात भरभरून दान करत आहेत. त्यानुसार दिवाळीच्या सुटीच्या कालावधीत महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गेले होते. या भाविकांमार्फत सोने- चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचे दान करण्यात आल्याने मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. 

दिवाळी व सणाची सुट्टी सुरू झाल्यानंतर तुळजाभवानी देवीच्या (Tuljabhavani Mandir) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली होती. दरम्यान पेड दर्शनासाठी देखील भाविकांची मोठी रांग होती. पेड दर्शनाच्या माध्यमातून मंदिराला कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असुन उर्वरित उत्पन्न हे सिंहासन पेटी, गुप्तदान पेट्या, देणगी व विविध कर यातुन मिळत असते. या कालावधीत लाखो भाविकांनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन देणगी अर्पण केली आहे.

तुळजाभवानी मातेच्या चरणी दिवाळीच्या पंधरा दिवसांच्या सुट्टीत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या कालावधीत लाखो भाविक दर्शनासाठी येऊन गेले असून तुळजाभवानी मंदीर संस्थानला २ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यात भाविकांनी सुमारे ६५३ ग्रॅम सोने (Gold) व १३ किलो चांदी देखील अर्पण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अभिवादन

Eyebrow Tips : तुमच्या चेहऱ्यानुसार आयब्रोचा आकार कसा असावा? सुंदर दिसण्यासाठी ठरेल फायदेशीर

ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी महागडी औषधे नको, किचनमधील 'या' 5 गोष्टींचा आहारात करा समावेश

Abhijit Dipke: CJPच्या आंदोलनाला परदेशातून फंडिंग मिळाल्याचा आरोप; अभिजीत दिपकेंनी दिलं थेट उत्तर

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT