Dharashiv Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Bribe Case : जिओ टॅगिंग करण्यासाठी घेतले १० हजार; कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या ताब्यात

Dharashiv News : धाराशिव पंचायत समितीच्या आवारात हा प्रकार घडला असून या प्रकरणात पंचायत समिती मधील कंञाटी तांत्रिक सहायकाला एसीबीने रंगेहात पकडले आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर मंजूर असून त्याचे काम सुरु करण्यासाठी या कामाचे जिओ टॅगिंग करणे आवश्यक असल्याचे यासाठी पंचायत समितीत आलेल्या शेतकऱ्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. दरम्यान वरिष्ठ साहेबांची १० हजार व स्वतःसाठी दीड हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. 

धाराशिव (dharashiv News) पंचायत समितीच्या आवारात हा प्रकार घडला असून या प्रकरणात पंचायत समिती मधील कंञाटी तांत्रिक सहायकाला एसीबीने रंगेहात पकडले आहे. प्रविण पार्श्वनाथ गडदे असे लाच स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदारांना रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर मंजुर आहे. तक्रारदाराला सदर विहीरीचे काम सुरु करायचे असल्याने त्या विहिरीचे काम चालू करण्यापुर्वी पंचायत समितीमधून जिओ टॅगिंग करणे अनिवार्य होते. यामुळे तक्रारदार पंचायत समिती कार्यलयात आले होते. याचे काम प्रवीण गडदे यांच्याकडे होते. 

त्यानुसार तक्रारदार यांनी प्रवीण गडदे याची भेट घेतली असता तक्रारदाराकडे (Bribe) लाचेची मागणी केली. यात स्वत:साठी दीड हजार रुपये व साहेबांसाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत (ACB) प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून कर्मचाऱ्याला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर प्रवीण गडदे यास ताब्यात घेत आनंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT