Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Ambadas Danve News : पोर्शे हिट अँड रनसाठी लावलेला कायदा बावनकुळेंच्या मुलासाठी लावा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

Dharashiv News : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोरशे येथे घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेमधील मुलाला जो कायदा लावण्यात आला आहे. तोच कायदा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलाला लावण्यात यावा; अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज धाराशिव (Dharashiv) जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. दानवे यांनी सांगितलॆ, कि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या मुलांने बीप खाऊन हॉटेलमधील बिलं बाहेर आली. या घटनेनंतर स्वतः बावनकुळे यांनी हा माझा मुलगा आहे हे सांगितले आहे. तरी देखील त्या मुलावर कारवाई झाली नाही. परंतु पोर्शे येथील हिट अँड रनसाठी जो कायदा लावला तोच कायदा बावनकुळे यांच्या मुलासाठी लावण्यात यावा, अशी मागणी केली. 

भाजपकडे गृह मंत्रालय असल्याने कारवाई नाही 

गृह मंत्रालय भारतीय जनता पार्टीकडे असल्याने ते या प्रकरणात कारवाई करत नाही. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडोडे भाजप सरकारने उडवले आहेत; अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT