Tuljabhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिर संस्थानला सहा दिवसात १ कोटी ५९ लाखांचे उत्पन्न; ४० हजार भाविकांचे पेड दर्शन

Dharashiv News : नवरात्रोत्सव सुरु असल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविक जात आहेत. यामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठ व देवीच्या मंदिरांवर भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सव सध्या सुरू आहे. या नवरात्र उत्सवातील घटस्थापनेपासुन ते सहाव्या माळेपर्यंत हजारो भाविकांनी मातेच्या चरणी माथा ठेकला आहे. यामुळे मंदिर संस्थानला आतापर्यंत १ कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

नवरात्रोत्सव (Navratri Festival) सुरु असल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविक जात आहेत. यामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठ व देवीच्या मंदिरांवर भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठापैकी तुळजापुर हे एक पुर्ण पिठ असुन तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातुन भाविक येत आहेत. (Tuljabhavani Mandir) तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे दर्शन घेण्याची सुविधा होती. 

तुळजाभवानी आईचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी ऑनलाईन माध्यमातून ६०८ तर ऑफलाईन माध्यमातून ४२ हजार ३७५ भाविकांनी दर्शन घेतले आहे. तसेच भाविकांसाठी तात्काळ दर्शन घेण्यासाठी ३०० रुपयांचा पेड आणि ५०० रुपयांचा व्हीआयपी दर्शन पास घेवुन तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यातुन तुळजाभवानी मंदीर संस्थानला सहा दिवसात १ कोटी ५९ लाख ६२ हजार ३०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

SCROLL FOR NEXT