Dharashiv fire accident latest news and investigation updates 
महाराष्ट्र

दिवाळी दिवशीच धाराशिवमध्ये अग्नितांडव; एकाच घरातील 6 जणांचा होरपळून मृत्यू

Massive Fire in Dharashiv: धाराशिवमध्ये दिवाळी सणाला गालबोट लागलंय. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाला. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली?. स्थानिकांनी अग्निशमन दलावर काय आरोप केलेत?. पाहूयात या रिपोर्टमधून.

Rohit Kadam

  • धाराशिवच्या येडशीमध्ये दिवाळीच्या रात्री घराला भीषण आग

  • येडशी येथील आगीत करंडे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

  • धाराशिव अग्नितांडवात एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू

देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना धाराशिवमधल्या अग्नितांडवानं संपूर्ण राज्य हादरलं. धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत करंडे कुटुंबातल्या 6 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. अगीतून घरातला केवळ एक जण बचावलाय. दिवाळीच्या पणत्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.

महत्त्वाचं म्हणजे, हे कुटुंब लवकरच आपल्या नवीन घरात जाणार होतं, अशीही माहिती समोर आलीये. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अग्निशमन दल घटनास्थळी उशिरानं दाखल झालं. अग्निशमनचे जवान आग विझवायला आले खरे मात्र त्यांच्याकडे ना पुरेसं डिझेल होतं ना पाणी, असा आरोप संतप्त गावकऱ्यांनी केलाय. धाराशिवच्या अग्निशमन दलाच्या त्रुटींवर नगरपरिषदेतल्या नगरसेवकांनीही बोट ठेवलंय. तसंच, या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिलीये.

आगीची दुर्घटना कुठेही घडू शकते. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी असलेली यंत्रणा सक्षम असणं गरजेचं आहे. मात्र धाराशिव पालिकेच्या अग्निमन दलातल्या सुविधांचा अभाव असेल तर लोकांच्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचीच किंमत करंडे कुटुंबाला मोजावी लागलीय. त्यामुळे दोषींवर कारवाई करून भविष्यात असल्या घटनांना आळा घालण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul President Election: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार स्पष्ट, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील कोण मारणार बाजी?

Maharashtra News Live Update: शेतमालाच्या भावातील तेजीला लागला ब्रेक, सोयाबीन- कापसाच्या दरात होतेय घसरण

Rain Alert: ऐन दिवाळीत पावसाचा धुमाकूळ सुरूच, ९ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

NCP Merger:राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार? दोन्ही गटांकडून आमदारांसोबत चर्चा सुरु

Tuesday Horoscope : ‘या’ ३ राशींची सर्वात भयानक स्टेज; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT