Dharashiv News Saam TV
महाराष्ट्र

Dharashiv Crime News: भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अघोरी प्रकार; मांत्रिकाचा भांडाफोड, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News: सर्व भूतबाधा दूर करतो असं सांगत एक भोंदूबाब नागरिकांची लूट करत होता.

Ruchika Jadhav , साम टिव्ही ब्युरो

Dharashiv Crime News: शिक्षणाचा अभाव आणि अज्ञान असल्याने आजही अनेक नागरिक अंधश्रद्धेचे बळी ठरतात. अशात धाराशिवमधून याबाबत एक बातमी समोर आली आहे. माझ्या अंगात देव आहे, मी सर्व भूतबाधा दूर करतो असं सांगत एक भोंदूबाब नागरिकांची लूट करत होता. पोलिसांनी या भोंदूबाबाच्या मुसक्या आवळ्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाशी तालुक्यातील इंदापूर साखर कारखाना परीसरातील बोरी शिवारात हा धक्कादयक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पोलीसांनी या प्रकरणी भोंदू बाबासह अन्य दोघांना बेड्या ठोकल्यात. तर त्यांच्याकडून दोरे, गंडे, काळ्या रंगाच्या बाहुल्या आदी जादू टोण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

वाशी तालुक्यातील इंदापूर परिसरातील सहकारी साखर कारखान्याजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये हा भोंदूबाबा बसत होता. बोरी शिवारातील हजरत खाँजा शेख फरीद शेकरगंज या दर्ग्याच्या शेजारी भोंदूबाबा लोकांना आपल्या जाळ्यात खेचत होता. मी जादुटोणा करणाऱ्यापासून तुमचा बचाव करु शकतो, भुतबाधा होण्यापासून तुम्हाला वाचवू शकतो, असं सांगत त्यांच्यावर अघोरी कृत्य करत होता.

तंत्र मंत्राचे समान आणि काळ्या रंगाच्या बाहुल्या यासाठी हा भोंदूबाबा २०० ते ३०० रुपये घेत होता. व्यक्ती आजारी असल्यास तुमच्या अंगात भूत आहे असे सांगत त्यांच्याकडून आणखी जास्त पौसे उकळायचा. पोलिसांना या भोंदूबाबाची माहिती मिळताच त्यांनी भोंदूबाबाच्या पत्र्याच्या शेडमध्ये धाव घेतली. शहजारवली उर्फ अहमद असं या भोंदूबाबाचं नाव आहे.

पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या पथकाने छापा मारत अहमदसह जादूटोण्यासाठीच्या साहित्याची विक्री करणाऱ्यांनाही अटक केलीये. भोंदूबाबाकडून पोलिसांनी ५८ हजार ७५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी पाण्यात विसर्जित न करता केले वृक्षारोपण

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

Viral Video : बाप असावा तर असा... मुलीच्या घटस्फोटानंतर ढोल ताशा वाजवत लेकीला आणलं घरी, नेटकऱ्यांनी म्हटलं...

Cancer: अचानक ताप अन् थकवा जाणवतो? ही कॅन्सरची लक्षणे नाहीत ना? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT