Dharashiv Crime Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Crime : हत्या करत केला अपघाताचा बनाव; बहिणीशी संबंध ठेवण्याच्या कारणावरून भयानक कृत्य, मारेकरी ताब्यात

Dharashiv News : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री गस्तीवर असताना त्यांना वाशी पोलीस स्टेशन हद्दीत घुलेचा मळा शिवारात सोलापूर- बीड हायवेवर एक इसम मृतावस्थेत पडून असल्याची माहिती प्राप्त झाली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून वाशी शिवारात नेत एकाची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर अपघात झाल्याचा बनाव मारेकऱ्यांनी केला होता, मात्र त्यांचा हा बनाव फसला असून धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून २४ तासात खुनातील संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. 

केज तालुक्यातील साळेगावचा रहिवासी मुस्तकीन जब्बार शेख असे घटनेत मृताचे नाव आहे. मुस्तकिन हा धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील मोहा येथे राहत होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री गस्तीवर असताना त्यांना वाशी पोलीस स्टेशन हद्दीत घुलेचा मळा शिवारात सोलापूर- बीड हायवेवर एक इसम मृतावस्थेत पडून असल्याची माहिती प्राप्त झाली. यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करत घातपात झाल्याचा संशय आला. 

मयत मुस्तकीन जब्बार शेख असल्याची ओळख पटल्याने पोलिसांनी तात्काळ त्याच्या नातेवाईकांना माहिती देत चौकशी केली. यात मुस्तकिन व अकबर नावाच्या इसमासोबत काही दिवसापुर्वी भांडण झाल्याचे समजले. या माहितीवरून तात्काळ तपासाची सुत्रे हलवत संशयित म्हणून अकबर सरदार शेख (रा. पिंपळनेर, ता. बीड) याचे नाव समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ संशयिताचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. 

चार जणांना घेतले ताब्यात 

पोलिसांचे पथक पिंपळनेर येथे जावून संशयिताची माहिती काढून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता मुस्तकिन याचे बहिणीशी अनैतीक संबंध असल्याच्या कारणावरून वाशी शिवारात नेवून भाऊ अमर शेख, वडील सरदार शेख आणि दाजी फारूख शेख यांच्या मदतीने मारून टाकल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT