Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू, आठजण जखमी

Dharashiv News : सध्या नवरात्रोत्सव असल्याने या कालावधीत देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. देवीच्या वेगवेगळ्या स्थळ किंवा कुलदेवतेवर जाऊन दर्शनाचा लाभ भाविक घेत आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: तुळजापूर मातेच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात एका भाविकांचा मृत्यू झाला, तर आठ भाविक जखमी झाले आहेत. हा अपघात तुळजापूर - सोलापुर महामार्गावर नळदुर्गजवळ आज दुपारच्या सुमारास घडला. 

सध्या नवरात्रोत्सव असल्याने या कालावधीत देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. देवीच्या वेगवेगळ्या स्थळ किंवा कुलदेवतेवर जाऊन दर्शनाचा लाभ भाविक घेत आहेत. दरम्यान (Tulja Bhavani) तुळजा भवानी मातेचे दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांची गाडी व जेवळी येथुन चिवरीच्या लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. कार व रिक्षाची समोरासमोर धडक होऊन हा (Accident News) अपघात झाला. 

कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक होवुन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले आहेत. कारमधील प्रवासी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन बिदरकडे जात होते. तर रिक्षामधील प्रवाशी जेवळी येथुन चिवरीच्या लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जात असताना रिक्षाला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. या अपघातात जखमी ६ जणांना सोलापूरला रुग्णालयात दाखल केले. तर उर्वरित रुग्णांवर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील मुळशी तालुका दुष्काळ यादीत समाविष्ट करण्यांत यावा, शेतकरी संघांची मागणी

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

SCROLL FOR NEXT