DHANANJAY MUNDE UNDER FIRE IN ‘GUNGI GUDIYA’ ROW, NCP INTERNAL RIFT DEEPENS saam tv
महाराष्ट्र

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

Sunil Tatkare Slams Munde as Controversy Engulfs Sunetra Pawar: गुंगी गुडियाच्या वादाला काँग्रेसपेक्षा जास्त राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेच जबाबदार असल्याची आता चर्चा आता रंगू लागलीय. आणि त्यामुळेच अजितदादांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत वाद उफाळून आलाय. नेमका काय आहे हा वाद? तटकरेंनी मुंडेंना कशामुळे जाहीरपणे सुनावलंय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्यानं राज्यात मोठा राजकीय पेटलाय. मात्र या वादाचं मुळ कारण ठरलंय ते सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बीडमधील पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंनी केलेली कृती. आणि त्यामुळेच आता राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय. कारण पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला मात्र धनंजय मुंडेंनी अरेरावी करत प्रश्नाला विरोध केला. आणि त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि वाद उफाळून आला. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी जाहीरपणे धनंजय मुंडेंचे कान टोचले.

खरंतर, धनंजय मुंडेंच्या बेलगाम वर्तनाचा हा काही पहिलाच प्रकार नाहीये. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरच खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये विकासनिधीच्या वाटपावरून शाब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा रंगली होती. इतकंच नव्हे तर सुनेत्रा पवार बीडमधील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ पीक विम्यासंदर्भात निवेदन देण्यास गेले असताना मोठा आवाज करू नका हळू बोला, हळू बोला असे म्हणत धनंजय मुंडेंनी रोखल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला होता.

त्यामुळे धनंजय मुंडेंच्या वर्तनाचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिलाय. त्यामुळेच बीडमधील प्रकारानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना पक्षीय शिष्टाचाराची आठवण करून दिली. मात्र यावेळी त्यांच्यामुळे सुनेत्रा पवारही वादात गोवल्या गेल्या. त्यामुळे 'गुंगी गुडिया'च्या टीकेला धनंजय मुंडेंचं जबाबदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

SCROLL FOR NEXT