Parli event: Dhananjay Munde signals political comeback while Pankaja Munde expresses dissatisfaction over ministry portfolio saam tv
महाराष्ट्र

'सर्वच क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच, आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, मुंडे भाऊ-बहिणीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Dhananjay Munde Cabinet Comeback Pankaja Munde Reaction: परळीतील एका कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडेंनी राजकीय आशावाद व्यक्त केलाय. तर दुसरीकडे, मुंडेंच्या भगिनी आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंनीही मनातील खदखद बोलून दाखवलीये. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बॅकफूटवर गेलेल्या धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळात कमबॅकचे संकेत दिलेत... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

ऐकलंत... माजी मंत्री धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा मंत्रिपद गेल्याची खंत व्यक्त केलीये. आम्ही दोघं बहीण-भाऊ मंत्री झालो मात्र एकाला घरी बसावं लागलं, अशी खदखद त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलीये. मात्र यावेळी त्य़ांनी येणारा काळ आपलाच असं म्हणत मंत्रिमंडळातील कमबॅकचे सूचक संकेत दिलेत. विशेष म्हणजे त्यांच्या बहिण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनीही मिळालेल्या खात्यासंदर्भात खंत व्यक्त केलीये.

खरंतर, बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंर बीडमधील गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरली. आरोपी वाल्मिक कराडशी निकटचे संबंध असल्याच्या आरोपावरुन बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून धनंजय मुंडे मंत्रिपदापासून दूर आहेत. मात्र त्यांनी वारंवार जाहीरपणे मंत्रिपद गेल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र त्यांची आशा मावळली नाही.

कारण,अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याचं अर्थमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. दुसरीकडे मंत्रालयातील लाचखोरी आणि इतर घटनांमुळे मंत्री नरहरी झिरवाळही वादात सापडले होते. अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याचा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न असू शकतो. या पार्श्वभूमिवर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला तर मुंडेंना संधी मिळू शकते का? मुंडेंची राजकीय फरफट थांबणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

SCROLL FOR NEXT