Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: जिल्ह्यातील जमावबंदीच्या आदेशाला परळीतील शिवभक्तांचा विरोध

जिल्हाधिकारी साहेब तात्काळ जमावबंदीचे आदेश माघे घ्या; अन्यथा तीव्र आंदोलन करू शिवभक्तांचा इशारा

विनोद जिरे

बीड- जिल्ह्यात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी, 10 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पासुन जमावबंदीचे (Curfew) आदेश काढले आहेत. याच आदेशाला परळीतून शिवभक्तांचा विरोध पाहायला मिळत आहे. शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी शिवभक्तांनी विरोध दर्शवत निदर्शन करत प्रशासनच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. अवघ्या काही दिवसांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांनी अचानक पणे जमावबंदी लागू केली आहे.

हे देखील पहा -

हा जमावबंदीचा आदेश आम्हाला मान्य नाही. जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव हा कोरोनाच्या कालावधीनंतर, या वर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होणार असताना अशा पद्धतीने निर्बंध लादल्यामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळं जिल्हाधिकार्यांनी हा आदेश तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. असा इशारा शिवप्रेमी सचिन स्वामी याने दिला आहे. दरम्यान यासंदर्भातील निवेदन परळी तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT