Kolhapur  Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News : अंबाबाईचं दर्शन घेतलं अन् मंदिरातून बाहेर पडताच भाविकाचा मृत्यू; नातेवाईकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पदरी दु:खच आलं

Kolhapur News : रामनाथ गबाजी जाधव ( वय 62 वर्ष) असं मृत भाविकांचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेल्या भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे ही घटना घडली आहे. रामनाथ गबाजी जाधव ( वय 62 वर्ष) असं मृत भाविकांचं नाव आहे.

रामनाथ जाधव हे अहमदनगर येथील रहिवाशी होते. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी ते अहमदनगरहून त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत आले होते. पहाटे पाच वाजता अंबाबाई देवीचे दर्शन त्यांनी घेतलं. त्यानंतर मंदिरातून बाहेर पडताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं होते. (Kolhapur News)

नातेवाईकांनी स्थानिकांच्या मदतीने तातडीने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हृदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद शवविच्छेदन अहवालात करण्यात आली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांनी याबाबत ही माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव वाढले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहोचले; जाणून घ्या 24k, 22k,18k चे दर

Maharashtra News Live Update : शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात छात्र भारतीचा मोर्चा

8th Pay Commission: मोठी बातमी! ₹45 हजार किमान पेन्शन, वर्षातून 4 वेळा DA वाढीची मागणी

FSSAI pan masala rules: पान मसाल्याचे प्लास्टिक पाउच होणार बंद; FSSAIचा मोठा निर्णय

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

SCROLL FOR NEXT