nitesh rane Saam
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: 'वादग्रस्त वक्तव्य टाळा', मुख्यमंत्र्यांकडून नीतेश राणेंना तंबी; कार्यालयात बोलावून खडसावले

Nitesh Rane controversial statement on Aurangzeb: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नीतेश राणेंना त्यांच्या कार्यालयात बोलावून तंबी दिली. "वादग्रस्त विधानं टाळा" अशा सुचनाही दिल्या.

Bhagyashree Kamble

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून विधानं करणाऱ्या नीतेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून चांगलंच खडसावलं आहे, अशीही चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याचं वृत्त धडकताच, नीतेश राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही. त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझं नाव आहे, असं राणे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळून पेटला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे. ती कबर उखडून टाकण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून होत आहे. १७ मार्चला नागपूरमध्ये २ गटात झालेल्या तुफान राड्यानंतर राज्यातील वातावरण आणखी बिघडलं.

याच घटनेवरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत निदर्शनं केली. दुसरीकडं दुसरीकडे राज्यातील मंत्री नीतेश राणे हे याबाबत वेगवेगळी विधाने करत आहेत. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीतेश राणेंना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतलं आणि तंबी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. वादग्रस्त वक्तव्ये टाळावेत, अशा सूचना फडणवीसांनी राणेंना दिल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईत राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. त्यात नीतेश राणे यांच्यासह अनेक आमदार आणि नेते या मुद्द्यावर विधानं करत आहेत. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.

वादग्रस्त वक्तव्ये टाळली जावीत, यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस पुढे सरसावल्याचे समजते. फडणवीस यांनी नीतेश राणेंना कार्यालयात बोलावून तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, असे त्यांनी सांगितल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर नीतेश राणेंचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीतेश राणेंना तंबी दिल्याचं वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झालं. त्यानंतर लागलीच नीतेश राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही. मी त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे, असं ते म्हणाले. मी स्नेहभोजनाच्या निमंत्रणासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मला ते काहीही बोलले नाहीत. तुम्ही त्याची चिंता करू नका, असंही राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Viral Video :बोंबिल मासा खाताय? वेळीच सावध व्हा! माश्याला लाल कलर लावतानाचा व्हिडिओ होतोय VIRAL

Fact Check: रेल्वेत रिक्षा टाकून भैय्ये पळाले? मराठी बोलता येत नसल्याने भैय्ये घाबरले?

Maharashtra News Live Update: धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच! कोणी काहीही बोलले तरी फरक पडत नाही; आमदार आमश्या पाडवी यांचा दावा

मंत्र्यांची जरांगेंशी चर्चा निष्फळ, जरांगे आंदोलनावर ठाम, सरकारला धास्ती

FDA ची राज्यभर धडक कारवाई; मुंबई क्रिकेट क्लबसह ११ ठिकाणाचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT