Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया!

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सेनेत सुरू झालेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शिवसेनेतल्या या बंडानंतर सेनेला मोठा धक्का बसला आहे. आता याच धक्क्यातून सावरण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेही कामाला लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे सध्या राज्यभरात दौरे काढत आहेत. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेवर मोठं पक्ष संकट उभ ठाकलं आहे. या संकटसमयी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेला पाठिंबा दर्शविला आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रितिक्रिया दिली आहे.

हे देखील पाहा -

शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. त्यासोबतच, त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे

गेली अनेक वर्ष न चुकता शिवसेनेच्या वतीने शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? एकनाथ शिंदे गट की उद्धव ठकरे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, जे नियमात आहे ते होईल, नियमांच्या बाहेर या सरकार मध्ये काहीच होणार नाही असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचा काय निर्णय आहे हे मला माहित नाही. ते मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे मेळावा घेणार का हेही मला माहित नाही. गृहमंत्री म्हणून एवढंच सांगतो मात्र जे नियमात आहे ते होईल. त्यामुळे आता शिवाजी पार्कमध्ये यंदा कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

SCROLL FOR NEXT