Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Latest Speech: सरकारी रुग्णालयांची अवस्था बघून टेन्शन येतं; देवेंद्र फडणवीसांचं विधान

Devendra Fadnavis Latest Speech: 'शासकीय रुग्णालयाची अवस्था आहे, ते बघून टेन्शन येतं. मात्र अनेक चॅलेंज आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

संजय डाफ

Devenndra Fadnavis News: कळवा रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. याचदरम्यान, राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या अवस्थेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

'शासकीय रुग्णालयाची अवस्था बघून टेन्शन येतं. मात्र अनेक चॅलेंज आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

नागपुरातील मेडिकल या शासकीय रुग्णालयातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि सोई सुविधांचे नुतनीकरण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, 'नागपूर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी नागपूर आहे. माझा जन्म याच शासकीय रुग्णालयात झाला आहे. शासकीय रुग्णालय चांगलं असलं पाहिजे. गरीब रुग्णांना कसेही उपचार दिले तरी चालते, अशी मानसिकता बदलली पाहिजे. डॉक्टरांमध्ये संवेदना असली पाहिजे, गरिबांना उत्तम उपचार दिले पाहिजे'.

'मला कोविड झाला, त्यावेळी मी शासकीय रुग्णालयात अॅडमिट झालो आणि बरा झालो. जे उपचार सामान्य रुग्णांना मिळतात, तेच उपचार आमदार खासदारांना मिळाले पाहिजे, असे उत्तम उपचार शासकीय रुग्णालयात मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.

'पारदर्शी कारभार रुग्णालयात हवा, खासगी रुग्णालयातही उपचार मिळायला हवे. तसे उपचार या शासकीय रुग्णालयात मिळत नाही. मला दर्जेदार काम हवे. जर तसे काम झाले नाही, तर मला कंत्राटदारांना वेगळे इंजेक्शन मला द्यावे लागेल,असेही ते म्हणाले.

'मला परदर्शी काम हवे आहे. कंत्राटदार कोण आहे हे मी कधीच बघत नाही, निधी वाढला तरी चालेल. मात्र, कामात कुठेही तडजोड केली जाणार नाही,याची काळजी घ्या, असे फडणवीस पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT