Devendra Fadnavis News Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Devendra fadnavis on manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर आता मराठा आंदोलकही त्यांच्यासोबत निघाले आहेत. या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

Devendra Fadnavis News :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जालन्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलनास्थळावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर आता मराठा आंदोलकही त्यांच्यासोबत निघाले आहेत. या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

आज रविवारी देवेंद्र फडणवीस साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी उपसा सिंचन योजना प्रकल्पाचा जलपूजन सोहळ्याला हजेरी लावली. योजनेचा जलपूजन सोहळा हा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सोहळ्यातील उपस्थितांनाही फडणवीसांनी संबोधित केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यात उपस्थितांना संबोधित करत असताना दुसरीकडे जालन्यात मनोज जरांगे यांनी सगेसोयरे कायदा, आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली. मनोज जरांगे हे शेकडो आंदोलकांसोबत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या सर्व घडामोडींवर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'मनोज जरांगे काय म्हणाले, मी ऐकले नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.

अंबादास दानवे काय म्हणाले?

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. 'मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्यावर सत्ताधारी उपकाराची भाषा करत आहेत हे दुर्दैवी आहे. राज्य सरकारने गुलाल उधळून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. गुलाल उधळला तर त्या स्टेजवर फडणवीस, अजित पवार कुठे होते? मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना एकटं पाडलय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे मत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT