Devendra Fadnavis announces Kokate’s demotion; Ministers from Shinde Sena and NCP under scanner after repeated controversies.  Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Rummy game scandal: वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात आलं... मात्र फडणवीसांनी कोकाटेंचं खातेबदल करुन सर्वच मंत्र्यांना इशारा दिलाय.

Omkar Sonawane

सभागृहात मोबाईलवर रमी गेम खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना अखेर दणका मिळालाय. त्यांच्याकडचं कृषी खातं काढून त्यांना युवक कल्याण व क्रीडा मंत्रिपद देण्यात आलंय. मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांना थेट इशारा दिलाय....

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यामुळे महायुतीची कोंडी झाली होती. तर विरोधकांनी थेट राज्यपालांची भेट घेत वादात अडकलेल्या महायुतीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंचं खातेबदल करत शिंदे सेना आणि अजित पवारांच्या वादग्रस्त मंत्र्यांचं टेन्शन वाढवलंय...

- सावली बार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत

- घरातील पैशांच्या बॅगमुळे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट टेन्शनमध्ये

- वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्री नितेश राणे अडचणीत

- हनी ट्रॅप प्रकरणी मंत्री गिरीश महाजनांवर आरोप

- पैसे घेऊन बदली केल्याचा संजय राठोड यांच्यावर आरोप

- वादग्रस्त वक्तव्य आणि रमी प्रकरणी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आहे.. त्यापार्श्वभुमीवर मंत्र्यांची विकेट पडली तर लोकांमध्ये महायुतीबद्दल नकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे... त्यामुळेच कोकाटेंचं डिमोशन करुन फडणवीसांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे... मात्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर मंत्री वठणीवर येणार की आपली वाचाळगिरी सुरुच ठेवणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:अमरावती मध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस असल्याची चर्चा

Beed : मुलांच्या शिक्षणासाठी खिशात दमडीपण नाही, मराठा बांधवाने उचलले टोकाचे पाऊल, बीडमध्ये हळहळ

Airport Jobs: १०वी,१२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! एअरपोर्टमध्ये नोकरी करण्याची संधी; १४०० पदांसाठी भरती

Kumbha Rashi : शत्रुंचा सामना, नोकरीतील संधी; वाचा कुंभ राशी आजचे भविष्य

RRB Recruitment 2025: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT