Devendra Fadnavis  Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News: विधिमंडळाच्या परिसरात गणपतराव देशमुख यांचे स्मारक लवकरच उभारणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच गणपतराव देशमुख यांचे लोकांना दिसेल असे स्मारक उभारणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

साम टिव्ही ब्युरो

Devendra Fadnavis News: गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे विधी मंडळाचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात त्यांचे स्मारक उभारण्याबाबत सर्व पक्षाचे एकमत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच गणपतराव देशमुख यांचे लोकांना दिसेल असे स्मारक उभारणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Latest Marathi News)

सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित गणपतराव देशमुख यांचे स्मारक व महाविद्यालय नामांतर सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते.

विरोधी पक्षात असताना आम्ही एकलव्य म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडून खूप शिकलो. मंत्री पद गेल्यावर शासकीय वाहन सोडून एसटीने जाणारे नेते, सभागृह सुरू व्हायच्या अगोदर प्रथम येणारे आणि सभागृह संपल्यावर शेवटी जाणारे, एकही दिवस सुट्टी न घेणारे आमदार, वन मॅन आर्मी म्हणजे गणपतराव अशी आठवण फडणवीस यांनी सांगून विदर्भाचे सिंचन आणि राज्यातील दुष्काळी भागाचे दुःख एकच असल्याचे गणपतराव सांगायचे व त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचे आणि सिंचनाचे प्रश्न आपणास समजल्याचे त्यांनी म्हटले.

कापूस मोठ्या प्रमाणावर पिकणाऱ्या भागात सूतगिरणी चालवणे कठीण आहे. तरी गणपतराव देशमुख यांनी सांगोला सारख्या दुष्काळी भागात सूतगिरणीची स्थापना करून या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध केला व अनेक संकटाचा सामना करून ही सूतगिरणी यशस्वीपणे चालवली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT