Devendra Fadnavis News:  Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साहित्य, भजनातून समाजाला दिशा दिली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Vishal Gangurde

Devendra Fadnavis News :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा काळ पारतंत्र्य, रुढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धेचा काळ होता. त्यावेळी समाजात तरुण मंडळी भरकटली होती. त्या तरुणांना राष्ट्रसंतांनी भजनाद्वारे प्रबोधनातून मोहीत केले. त्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. (Latest Marathi News)

हिंगणघाट तालुक्यातील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'विदर्भ ही संतांची भूमी आहे. विदर्भातील ३ संतांनी प्रबोधनाचं काम केलं. संत गुलाबराव महाराजांनी प्रबोधनपर साहित्याची निर्मिती केली. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेसोबतच जातीभेद, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल भारतात जागरुकता आणली आहे'.

'तुकडोजी महाराजांनी आपले साहित्य, भजनातून एक मोठी पिढी तयार केली आहे. या पिढीने पुढे सशक्त समाज तयार करण्यात हातभार लावला आहे. या पीढीने आम्ही पारतंत्र्यात रहायला तयार नसल्याचे वातावरण प्रबोधनातून तयार केले. समाजातील समस्यांचं निराकरण त्यांच्या भजनात दिसून येते. त्यांनी भजनातून चांगला विचार समाजाला दिला. राष्ट्रसंतांनी मराठी, हिंदीत 1200 भजने लिहली. ही भजने देशभरात प्रसिद्ध झालीत, असे ते पुढे म्हणाले.

'महाराजांनी समाजाला दिलेली 'ग्रामगीता' ही सर्वात मोठी देणगी दिली आहे. ग्रामगीता कर्तव्याची जाणीव करुन देते. स्वयंपूर्ण गाव कसे तयार होईल, आपणच आपले शिल्पकार कसे होऊ, याबद्दल ग्रागीतेत सांगितल्याचे फडणवीसांनी सांगितलं. श्रीसंत भोजाजी महाराज मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येतात. तर या मंदिरातील प्रसादाची पुरणपोळी समाधान देणारी असल्याचेही फडणवीसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT