Bribe Saam tv
महाराष्ट्र

Sangli: २५ हजार रुपयांची लाच घेताना ACB नं तलाठ्यास पकडले; काेतवालही ताब्यात

या प्रकरणात कोतवालास ही देशिंग तलाठी कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.

विजय पाटील

सांगली : जमीन खरेदी केलेल्या खरेदी दस्ताची सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्यांकडून पंचवीस हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना देशिंगचा तलाठी (deshing village talathi) सचिन रघुनाथ पाटील (वय ३८) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) सापळा रचून रंगेहात पकडले. त्याचबरोबर कोतवाल आनंदा पाटील याने तक्रारदाराने तलाठ्यास (talathi) लाच द्यावी यासाठी प्रोत्साहन दिल्याने कोतवाल आनंदा पाटीलला ताब्यात घेतले. (sangli latest marathi news)

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीपत्राच्या दस्ताची सातबाऱ्यावर नोंद करून देण्यासाठी देशिंगचे तलाठी सचिन पाटीलने ३० हजार रुपयांची मागणी केली हाेती. त्याची तक्रार एसीबीकडे आल्यानंतर तलाठ्यावर सापळा लावण्यात आला. चर्चेअंती २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तसेच कोतवाल आनंदा पाटील याने तलाठी सचिन पाटील यांना लाच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर एसीबीच्या सांगली पथकाने देशिंगच्या तलाठ्या विरुद्ध तलाठी कार्यालयात सापळा लावला असता लोकसेवक तलाठी सचिन रघुनाथ पाटील तहसिल कार्यालयाजवळ तक्रादाराकडून २५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT