parbhani , ncp , jayant patil, shivsena, eknath shinde, maharashtra government saam tv
महाराष्ट्र

Maharashtra : 'त्यांच्यात अंतर्गत कलह, उपमुख्यमंत्री फडणवीस नाराज' (पाहा व्हिडिओ)

कार्यकर्ते हे प्रवेश करत नाही तर पुढारी हे शिंदे गटात जात आहेत.

राजेश काटकर

Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परभणी दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी शिंदे फडवणीस सरकारवर यावेळी जोरदार हल्ला चढवला. भाजपमध्ये सुद्धा शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून प्रचंड असंतोष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सुद्धा नाराज आहेत. फडवणीस हे मुख्यमंत्री होणार होते मात्र तसं झालं नाही. महाराष्ट्रातील (maharashtra) हा सत्ता बदल कोणालाच रुचलेला नाही असे पाटील यांनी नमूद केले. (parbhani latest marathi news)

निर्णय लवकर व्हावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले शिंदे फडणवीस सरकारच भवितव्य अद्यापही सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्ट तारीख वर तारीख देत असल्याने यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी दर्शवली. सुप्रीम कोर्टाने सलग बसून याचा तातडीने निर्णय दिला पाहिजे, विलंबाने निर्णय देणे हे चुकीचा भाग आहे. राज्य सुरू झालं आहे सुप्रीम कोर्ट का निकाल देत नाही याचा आश्चर्य वाटतंय, सतत बसून तातडीने निर्णय दिला पाहिजे असे पाटील यांनी नमूद केले.

परभणीतील शिवसैनिक त्यांना जागा दाखवेल

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजप सोबत सत्ता स्थापन केली तर अनेक शिवसैनिक हे शिंदे गटात जात असल्याने यावर जयंत पाटील यांनी शिवसेनेची बाजू धरली. कार्यकर्ते हे प्रवेश करत नाही तर पुढारी हे शिंदे गटात जात आहेत. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे. तसेच परभणीतील शिवसैनिक ढसाळला नाही शिवसैनिक जागेवरच आहे. परभणीतील शिवसैनिक स्थिर आहे शिवसैनिक आगामी निवडणुकीत भाजप शिंदे गटास जागा दाखवतील असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT