Black Magic Near Ajit Pawar House Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: फोडलेले नारळ, हळद-कंकू अन् लिंबू...; बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा

Black Magic Near Ajit Pawar House: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत.

Priya More

Summary:

  • बारामतीत जादूटोण्याच्या घटनेने खळबळ उडाली

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर अघोरी पूजा

  • फोडलेले नारळ, फुलं, हळद-कंकू, कापलेले लिंबू अन् नैवेद्य रस्त्याच्या मधोमध ठेवत केली अघोरी पूजा

मंगेश कचरे, बारामती

बारामतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील घराबाहेर अघोरी पूजा करण्यात आली आहे. फोडलेले नारळ, फुलं, हळद-कंकू, कापलेले लिंबू अन् नैवेद्य रस्त्याच्या मधोमध ठेवत अघोरी पूजा केल्याचा प्रकार घडला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ही अघोरी पूजा कुणी केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजा करण्यात आली. अजित पवारांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर फोडलेले नारळ, फुलं, हळद-कंकू, कापलेले लिंबू अन् नैवेद्य ठेवण्यात आल्याचे दिसून आले. आज सकाळी सहयोग सोसायटीच्या समोर अघोरी पूजा करून भानामतीचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी हा जादूटोणाचा प्रकार पाहिला त्यानंतर बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली.

निवडणूकीच्या तोंडावर असा प्रकार घडल्याने बारामतीमधील नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. काही वेगळेचं करण्याच्या हेतुने हा प्रकार केल्याची जोरदार चर्चा बारामतीत सुरू आहे. निवडणूकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने कुणाचे तिकीट मिळवण्यासाठी किंवा कुणाचे तिकीट कापण्यासाठी हा प्रकार केला की काय? अशा देखील चर्चा सध्या बारामतीमध्ये होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

Grapes Cleaning: तुम्ही द्राक्षे धुवून लगेच खाताय का? व्यवस्थित स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Insulin resistance: सतत भूक लागतेय, थकवा येतोय? डायबेटीजचं सुरुवातीची लक्षणं असू शकतं, शरीरातील ५ बदलांकडे दुर्लक्ष करू नका!

Matar Recipe : वाटीभर मटारचा १० मिनिटांत बनवा हेल्दी नाश्ता, मुलं आवडीने फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT