Deputy Chief Minister Eknath Shinde Ratnagiri Sabha SaamTV
महाराष्ट्र

Eknath Shinde : शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष, इथं कुणी मालक किंवा नोकर नाही; एकनाथ शिंदेंचा रोख कुणाकडे?

Eknath Shinde on Uddhav Thackeray : आम्ही विकासाची कोणती योजना बंद करणार नाही. आम्ही खोटी आश्वासने देत नाही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. आम्ही पूर्ण विचार करून योजना केल्या आहेत. लाडकी बहीण यासह इतर योजना सुरुच राहतील, असं देखील शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Prashant Patil

रत्नागिरी : शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कुणी मालक किंवा नोकर नाही. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. लोकांना सोन्याचे दिवस दाखविण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. आमची सुरुवात अडीच वर्षांपूर्वी झाली. तो वेग आता आपल्याला दाखवायचा आहे. आता आम्ही घरात बसून सरकार चालवले नाही, लोकांसाठी रस्त्यावर फिरलो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी राजन साळवी आणि इतर कोकणातील नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

आम्ही विकासाची कोणती योजना बंद करणार नाही. आम्ही खोटी आश्वासने देत नाही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. आम्ही पूर्ण विचार करून योजना केल्या आहेत. लाडकी बहीण यासह इतर योजना सुरुच राहतील, असं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

राजकारणात पदं वर खाली होतात. पण एकनाथ शिंदे यांना ‘लाडका भाऊ’ ही नवीन ओळख मिळली. ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे. याचं मला समाधान आहे. मला अभिमान आहे. माझ्या रक्तातील थेंब असेपर्यंत महाराष्ट्रासाठी समर्पित भावनेनं काम करेन. खोके खोके बोलत असतात. या महाराष्ट्राने तुम्हाला घरी बसवलं. तरीही त्यांना कळत नाही. ‘रस्सी जळाली पण पिळ जात नाही’ अशी यांची अवस्था आहे असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी टीका करताना म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT