श्रेणी-2 च्या पशुवैद्यकीय केंद्रांना श्रेणी-1 चा दर्जा देण्याची मागणी संजय जाधव
महाराष्ट्र

श्रेणी-2 च्या पशुवैद्यकीय केंद्रांना श्रेणी-1 चा दर्जा देण्याची मागणी

बुलडाणा जिल्ह्यात श्रेणी-2 चे पशु वैद्यकीय उपचार केंद्र जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त जनावरांवर प्राथमिक उपचार केला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा: बुलडाणा जिल्ह्यात श्रेणी-2 चे पशु वैद्यकीय उपचार केंद्र जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त जनावरांवर प्राथमिक उपचार केला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी जनावरांना उशिरा उपचार मिळाल्याने पशु हानी देखील होते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील श्रेणी-2 च्या पशुवैद्यकीय केंद्रांना श्रेणी-1 चा दर्जा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा पशु संवर्धन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

जिल्ह्यामध्ये एकूण 122 पशुवैद्यकीय उपचार केंद्र असून त्यापैकी फक्त 35 केंद्र हे श्रेणी-1 चे असून इतर सर्व उपचार केंद्र हे श्रेणी-2 चे आहेत, त्यामुळे या श्रेणी-2 च्या केंद्रांना श्रेणी-1 चा दर्जा द्यावा, त्याचबरोबर जनावरांसाठी मुख्यालयी एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन व रोग निदानासाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात यावी.

जणेकरून जनावरांच्या आजाराचे तात्काळ निदान होऊन त्यांच्यावर उपचार केले जातील आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळले जाईल. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, मागण्या मंजूर न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT