Zomato : झोमॅटोच्या 'स्लॉट बुकिंग' सक्तीमुळे डिलिव्हरी बॉईजवरती उपासमारीची वेळ Saam TV
महाराष्ट्र

Zomato : झोमॅटोच्या 'स्लॉट बुकिंग' सक्तीमुळे डिलिव्हरी बॉईजवरती उपासमारीची वेळ

डिलिव्हरी बॉईजच्या या आंदोलनामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही सहभाग घेतला आहे. स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय करणाऱ्या झोमॅटो कंपनीला मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा मनसेने झोमॅटोला दिला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिकमध्ये झोमॅटो कंपनीविरोधात डिलिव्हरी बॉईजनी (Delivery Boys) आंदोलन केलं आहे. कंपनीच्या 2 तासांच्या स्लॉट बुकिंग म्हणजेच गिग्स सिस्टीमविरोधात या डिलिव्हरी बॉईजनी 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन केलं आहे. कंपनीने 2 तासांचा स्लॉट बुक करण्याची सक्ती आणि 2 तासाचा स्लॉट बुक केला नाही तर काम नाही अशी भूमिका घेतल्याने अनेक डिलिव्हरी बॉईजनी काम नसल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

दरम्यान कंपनीविरधातील या आंदोलनामध्ये शेकडो डिलिव्हरी बॉईस सहभागी झाले असून 3 दिवसांपासून नाशिकमधील (Nashik) झोमॅटोची सेवा बंद आहे. मात्र कंपनीच्या या गिग्स सिस्टीममुळे अनेक डिलिव्हरी बॉईजवर उपासमारीची वेळ आली आहे, गिग्स सिस्टीम बंद करण्याची आणि पूर्वीप्रमाणेचं शहर झोन फ्री करण्याची मागणी या डिलिव्हरी बॉईजनी केली आहे.

दरम्यान डिलिव्हरी बॉईजच्या या आंदोलनामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (MNS) सहभाग घेतला आहे. स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय करणाऱ्या झोमॅटो कंपनीला मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा मनसेने झोमॅटोला (Zomato) दिला आहे. तसंच मुंबईतील झोमॅटो कंपनीच्या ऑफीसवर आंदोलनाचा इशाराही मनसेने दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT