Court  Saam Tv
महाराष्ट्र

Court: एअर इंडिया कर्मचा-यास चप्पलने मारहाण प्रकरणात सेनेच्या माजी खासदारास मिळाला दिलासा

याबाबतची माहिती माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : एअर इंडिया (air india) कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड (former mp ravindra gaikwad) यांच्यावरील दाेन कलम न्यायालयाने कमी केल्याने त्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर केवळ कलम ३५५ नुसार खटला चालणार आहे. (osmanabad latest marathi news)

सन २०१७ शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून (pune) दिल्लीला (delhi) जात होते. या दरम्यान एअर इंडिया कर्मचाऱ्यास बिजनेस क्लासचे तिकीट दिले नाही म्हणून श्री. गायकवाड यांनी विमानातच कर्मचाऱ्यास चपलेने मारहाण केली होती असा आराेप त्यांच्यावर आहे.

या प्रकरणी कलम ३०८, २०१, ३५५ यानूसार त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. त्यानंतर कलम ३०८ आणि २०१ ही दाेन कलम न्यायालयाने वगळली आहेत अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठी बातमी! 42 आमदारांवर कारवाई होणार? उच्च न्यायालयानं बजावली नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार : प्रफुल्ल पटेल

Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

SCROLL FOR NEXT