Ravi Rana  Saam TV
महाराष्ट्र

दिल्ली कोर्टाकडून आमदार रवी राणा यांना दिलासा; उद्या राणा अमरावतीत येणार?

रवी राणा यांना एका प्रकारे दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

अरुण जोशी

अमरावती: आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्यावर अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्या घटनेच्या दिवसापासून रवी राणा दिल्लीतच आहे. मात्र आज रवी राणा यांनी दिल्लीच्या (Delhi) पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली यात दिल्लीच्या कोर्टाने रवी राणा यांना एका आठवड्याचा ट्रानजिक बेल मिळाली असल्याची माहिती रवी राणा यांनी दिली आहे. त्यामुळे रवी राणा यांना एका प्रकारे दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

तर मला व खासदार नवनीत राणा यांना मुख्यमंत्री फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याने मी आता उद्या नागपूर हायकोर्टात धाव घेऊन या विरोधात दाद मागणार व ज्या पोलिसांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आता उद्या रवी राणा अमरावतीत येणार असल्याची माहिती आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World : धगधगता ज्वालामुखी ते विषारी सापांचा सुळसुळाट, जगातील ७ धोकादायक ठिकाणे

पाकिस्तानची जागेवर पलटी! स्वतःच पोसलेल्या दहशतवाद्यावर ७० लाखांचा 'इनाम'

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

SCROLL FOR NEXT