Nanded: देगलूर विधानसभेसाठी आज मतदान, 12 उमेदवार रिंगणात Saam TV
महाराष्ट्र

Nanded: देगलूर विधानसभेसाठी आज मतदान, 12 उमेदवार रिंगणात

संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या (Deglur Assembly Election) पोट निवडणूकीसाठी (By Election) आज मतदान होणार आहे.

संतोष जोशी

नांदेड: संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या (Deglur Assembly Election) पोट निवडणूकीसाठी (By Election) आज मतदान होणार आहे. सकाळी सात पासून मतदानाला सुरूवात झालीय. कांग्रेस चे आमदार रावसाहेब आंतापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पालकमंत्री अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजप, (BJP) महाविकास आघाडी, (Mahavikas Aghadi) वंचितच्या उमेदवारात चुरस निर्माण झाली आहे.

निवडणूक प्रक्रीयेत सहभागी असलेले कर्मचारी काल रात्रीच ईव्हीएम मशीन घेऊन वाहनातून मतदान केंद्राकडे मुक्कामी पोहोचले. निवडणूक रिंगणात 12 उमेदवार आहेत. या निवडणुकीत तीन लाख मतदार आहेत. 412 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. आठ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. जवळपास 2000 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेत कार्यरत असून, कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Maharashtra News Live Update: इगतपुरी पर्यटक मारहाण प्रकरणी नऊ आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

SCROLL FOR NEXT