Deepali Sayed/Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा; दीपाली सय्यद यांचं ट्विट

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - शिवसेना (Shivsena) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या विरोधात जात त्यांनी आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरलं आहे. या सर्व आमदारांसह शिंदे हे आसामची राजधानी गुवाहटी येथे गेले आहेत. शिंदे यांनी बंडखोरी केल्याचं समजताच राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झालेत. शिवसेनेशी गद्दारी करू नका असे आवाहन शिवसैनिक करताना दिसून येत आहे. अशातच शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी देखील एक ट्विट केलं आहे.

हे देखील पाहा -

देवा लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेल चे बिल वाढत आहे, विरोधकांचा भाव वाढत आहे, ED ची नोटीस लाव वाढत आहे, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढत आहे, आमदारांचा ताव वाढत आहे, विधिमंडळातील डाव वाढतो आहे लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा! अशा स्वरुपाचं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) नाराजीनाट्य सुरु झालं.एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. एकनाथ शिंदे आणि तीसहून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आधी सूरत त्यानंतर गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचं लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींवर लागलं आहे. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? उमेदवारीच्या निर्णयावर आक्षेप घेत सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT