MP Sanjay Raut, MLA Deepak Kesarkar, Barsu Refinery Project, Tesla Company  saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut लाेकांना Confuse करतात : दीपक केसरकर

येत्या 30 मे राेजी मुख्यमंत्री सावंतवाडीत येणार असल्याचे मंत्री केसरकरांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News : टेस्ला कंपनी जर भारतात येत असेल तर बारसुला जागा देऊन टाका, उत्तम जागा आहे. आम्ही स्वागत करू या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत लोकांना कन्फ्युज करतात असा टाेला हाणला. ते सावंतवाडीत माध्यमांशी बाेलत हाेते.  (Maharashtra News)

शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे ३० मे राेजी सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडीत (sawantwadi) येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. सावंतवाडी शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या भूमिपूजन तसेच अन्य विकासकामांची भूमिपूजनेही मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती सावंतवाडीत आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी दिली.

दरम्यान टेस्ला कंपनी जर भारतात येत असेल तर बारसुला जागा देऊन टाका या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर म्हणाले संजय राऊत लोकांना कन्फ्युज करतात. टेस्ला कंपनीचा आणि बारसूच्या जागेचा सबंध काय ? एवढ्या मोठ्या जागेच टेस्ला कंपनी करणार काय असा सवाल केसरकर यांनी संजय राऊतांना केला.

बारसू मध्ये रिफायनरी आली तर नावाशिवा बंदरा प्रमाणे कोकणातील बंदर विकसित होतील. लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होईल. बारसूत रिफायनरी (Barsu Refinery Project) व्हावी यासाठी तुम्हीच मागणी करता आणि रिफायनरी आली की विरोध करता असा टोलाही केसरकर यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे नाव न घेतला लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ याला परदेशातून आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Painkiller Side Effects: तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी पेनकिलर आरोग्यावर करते परिणाम

Pune Terror Attack : पुण्यात खळबळ! 'I Love Mohammad' नंतर आता 'इस्लाममध्ये संगीत हराम आहे' आशयाचे पोस्टर्स झळकले

Myanmar: म्यानमारमध्ये बौद्ध उत्सवाला लक्ष्य, पॅराग्लायडरद्वारे बॉम्ब टाकले; २४ जणांचा मृत्यू

Kantara Chapter 1: 'हा चित्रपट आणि पात्र...'; ऋषभ शेट्टीने सांगितलं 'या' कारणामुळे 'कांतारा' ब्लॉकबस्टर होऊ शकला

SCROLL FOR NEXT