Anna Hazare सचिन आगरवाल
महाराष्ट्र

सुपरमार्केट मधील वाईन विक्रीविरोधात आंदोलनावर आज निर्णय - अण्णा हजारे

काल झालेल्या बैठकीनंतर अण्णांचं काही प्रमाणात समाधान करण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांना यश आल्याचं दिसून येत आहे.

सचिन अगरवाल

अहमदनगर - किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय रविवारी घेणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी सांगितलं आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची भेट घेतली. या दोघांमध्ये चर्चा झाली यावर आपलं 50 टक्के समाधान झाल्याचं सांगत अण्णा हजारेंनी उपोषणासंबंधी रविवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे.

हे देखील पहा -

काल झालेल्या बैठकीनंतर अण्णांचं काही प्रमाणात समाधान करण्यात राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांना यश आल्याचं दिसून येत आहे.नायर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपलं 50 टक्के समाधान झाल्याचं सांगत उपोषणाबाबत आज निर्णय घेणार असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.

सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता. 14 तारखेला अण्णा राळेगणसिद्धी येथे सरकारच्या विराधात उपोषण करणार होते. मात्र काल झालेल्या भेटीनंतर उपोषणाबाबत आज निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अण्णा हजारे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT