नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय ढकलला पुढे Saam TV
महाराष्ट्र

नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय ढकलला पुढे

दक्षिण आप्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हायरसने संपुर्ण जगाची चिंता वाढवली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे. नाशिक महापालिका आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे. दक्षिण आप्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हायरसने संपुर्ण जगाची चिंता वाढवली आहे. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.

दरम्यान राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील शाळांनी पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. परंतु कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने पुन्हा सर्वांची झोप उडवली आहे. दक्षिण आप्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ओमायक्रॉनच्या अनुषंगाने राज्यात बाकीचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. काही जिल्ह्यात लेवल ३ तर काही जिल्ह्यात लेवल ४ चे निर्बंध लावण्यात आले आहेत.

दरम्यान ओमायक्रॉन व्हायरसच्या संकटावर सोलापूर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर कडक बंधने घालण्यात आली आहेत. जिल्ह्यात अद्याप 10 लाख लोकांचे लसीकरण बाकी असून लस घेणाऱ्या नागरिकांनाच शासकीय कार्यालयात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. देशासमोर नव्याने उभे ठाकलेल्या ओमायक्रॉन व्हायरसच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन कडक निर्बंधाचा निर्णय घेतला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT