Death Threats Saam Tv News
महाराष्ट्र

Bollywood Death Threats: कपिल शर्मा, राजपाल यादव आणि रेमो डिसूझाला जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानशी कनेक्शन?

Kapil Sharma Death Threat Email: बॉलवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण ताजे असतानाच बॉलिवूडमध्ये एका नव्या प्रकरणानं तोंड वर काढलंय. बॉलिवूडमधील काही कलाकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

बॉलवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण ताजे असतानाच बॉलिवूडमध्ये एका नव्या प्रकरणानं डोकं वर काढलंय. बॉलिवूडमधील काही कलाकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. विनोदी कलाकार कपिल शर्मा तसेच राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुंगधा मिश्रा या नामांकित कलाकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. हा धमकीचा इमेल बिष्णू या व्यक्तीनं पाठवलाय. प्राथमिक तपासात हा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालंय.

ई-मेलचा पाकिस्तानशी कनेक्शन?

कॉमेडियन कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुंगधा मिश्रा या नामांकीत कलाकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. हा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या धमकीच्या ई-मेल प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात आलीय. तसेच या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरूय. या कलाकारांना ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला जर ८ तासात प्रतिसाद मिळाला नाही तर, कारवाई करणार असल्याची धमकी त्यानं दिलीय. प्राथमिक माहितीनुसार हा ई-मेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

या ई-मेलमध्ये कलाकारांसह त्यांच्या कुटुंबालाही टार्गेट करण्यात आलंय. या प्रकरणी मुंबईतील आंबोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी कलम ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस तपासात ई-मेलचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानचा असल्याचं समोर आलंय. तसेच ई-मेलच्या शेवटी बिष्णू नावाने सही करण्यात आलीय. दरम्यान हा ई-मेल नेमका कुणी पाठवला? या ई-मेलमागे त्या व्यक्तीचा हेतू काय? याचा तपास पोलीस करीत आहेत.

ई-मेलमध्ये काय म्हटलंय?

मिडिया रिपोर्टनुसार, धमकीचा हा ई-मेल बिष्णू नावाच्या व्यक्तीनं पाठवलाय. त्यात त्यानं, 'आम्ही हे सर्व पब्लिसिटी स्टंट म्हणून करत नाही आहोत. तुमच्या सर्व उपक्रमांची माहिती आमच्याकडे आहे. आम्ही पुढील ८ तासांमध्ये तुमच्याकडून त्वरीत प्रतिसादाची अपेक्षा करत आहोत. जर आम्हाला काही उत्तर मिळाले नाही तर, आम्ही समजू की तुम्ही हे प्रकरण गांभीर्यानं घेतलेलं नाही. बिष्णू'. या प्रकरणाचा आयपी अॅड्रस आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT