Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Malegaon Crime News: मालेगावात पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या पोलिसांचा तपास सुरू

मालेगावात वृध्द दांपत्याचा संशयास्पद मृत्यू

साम वृत्तसंथा

Malegaon Crime News: मालेगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबातील पती पत्नी दोघांचे संशयास्पद मृतदेह अढळून आले आहेत. एकाच वेळी दोघांचे मृतदेह मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरवण निर्माण झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी याचा पंचनामा केला असून अधिक चौकशी सुरू आहे. ( Latest Marathi News )

मालेगाव शहरातील हिंगलाजनगर भागात गुरूवारी पहाटे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अलताब हुसेन मोहम्मद सईद आणि अल्कमा अलताब हुसेन अशी मृत दांपत्याची नावे आहेत. अलताबचा मृतदेह जखमी अवस्थेत सापडला तर अल्कमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. दोघांचेही मृतदेह त्यांच्याच राहत्या घरात आढळून आले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अलताब हुसेन मोहम्मद सईद व अल्कमा अलताब हुसेन हे वयस्कर दांपत्य हिंगलाज नगर येथे एकटेच राहत होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून झाला असावा असा अंदाज पोलिस वर्तवत आहेत. तसेच विविध शक्यता देखील पोलिस पडताळून पाहत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रिती सावंत सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बारकाईने पंचनामा व घटनास्थळी पाहणी केली. आता या संशयास्पद मृत्यूचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT