Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवार भल्या पहाटेच पोहोचले धुळ्यात, कार्यकर्त्यांची उडाली चांगलीच तारांबळ

Ajit Pawar Dhule Visit: आज उपमुख्यमंत्री अजित पवार धुळ्यात होते. ते आज वेळेआधीच कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ajit Pawar on Dhule Visit

उपमुख्यमंत्री अजित पवार आज भल्या पहाटेच धुळ्यात (Dhule) होते. अजित पवार यांची वेळेसंदर्भातील कार्यतत्परता पुन्हा एकदा बघावयास मिळाली आहे.

अजित पवार (Ajit Pawar Dhule Visit) आज भल्या पहाटेच धुळ्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. वेळेअगोदरच उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटन प्रसंगाला उपस्थित राहिले. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

इतर वेळी राजकीय नेते मंडळी उद्घाटनासाठी कधीच वेळेवर उपस्थित राहत नाही, असं वेळोवेळी बघायला मिळालं आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेल्या वेळेच्या आधीच ते उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या वेळेसंदर्भातील कार्यतत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इर्शाद जहागीरदार त्यांच्या कार्यालयात उद्घाटनासाठी अजित पवार (Ajit Pawar In Dhule) भल्या पहाटेच पोहोचल्याचं बघावयास मिळालं आहे.

यावेळी भल्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या स्वागतासाठी जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली. त्याचबरोबर भल्यामोठ्या क्रेनच्या साहाय्याने अजित पवार यांच्यासाठी स्वागतचा हार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सज्ज करण्यात आला होता.

फटाक्यांच्या आतिशबाजीत मोठ्या जल्लोषात यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं धुळेकरांनी स्वागत केलं आहे. धुळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जंगी स्वागत पार (Maharashtra Politics) पडलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT