Chhatrapati Sambhaji Nagar News , Aurangabad DCC Bank saam tv
महाराष्ट्र

असं काय घडलं? दाैरापूर्ण हाेताच DCC Bank चे अध्यक्ष नितीन पाटील यांनी अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

Chhatrapati Sambhaji Nagar News : पाटील यांच्याबाबत सहका-यांच्या तक्रारी वाढल्या हाेत्या.

माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील (Nitin Patil Resigns From DCC Bank Chairman Post) यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा आज (मंगळवार) राजीनामा दिला. नाशिक दाै-यावरुन येताच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. (Maharashtra News)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील यांच्या कार्यशैली विषयी नाराज असलेल्या पंधराहून अधिक संचालकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली हाेती. राजीनामा न दिल्यास अविश्वास ठराव आणू असा इशारा संचालकांनी दिला होता. या संदर्भात पत्रही दिले होते.

सोमवारी नितीन पाटील हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. हा दौऱ्या संपताच त्यांनी आज (मंगळवार) सकाळी घरूनच त्यांचा राजीनामा पाठवून दिला.

खडाजंगी....

नितीन पाटील हे सन 2019 पासून आतापर्यंत बँकेचे (dcc bank) अध्यक्ष होते. दरम्यान सोसायटी नोंदणी संदर्भात दोन दिवसापूर्वी संचालक आणि अध्यक्ष नितीन पाटील यांच्यात खडाजंगी झाली होती. याच वेळी अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार व संचालकांचे म्हणणे ऐकत नसल्याच्या तक्रारी अध्यक्षांच्या विरोधात होत्या. यामुळे सर्वांनी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अन्यथा अविश्वास ठराव आणू असा इशारा दिला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT