Dhule Crime News भूषण अहिरे
महाराष्ट्र

दुहेरी हत्याकांडाने धुळे हादरले! मायलेकींची धारदार शस्त्राने हत्या

तालुक्यातील तरवाडे गावात मायलेकींची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली आहे.

भूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे: तालुक्यातील तरवाडे गावात मायलेकींची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. (Dhule Crime News)

धुळे तालुक्यातील तरवाडे या गावात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या चंद्रभागाबाई माळी वय (वर्ष 65) व त्यांची मुलगी वंदना महाले वय (वर्ष 45) यांचा पहाटेच्या दरम्यान रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर या गावामध्ये एकच खळबळ उडाली यासंदर्भात तालुका पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्याचबरोबर इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे.

मुलगी वंदना तिचे वैवाहिक वाद सुरू असल्यामुळे ती आईकडेच राहत होती, यादरम्यान अशा पद्धतीने या दोघा मायलेकींचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर या हत्येसंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत. मृत झालेल्या दोनही मायलेकींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत असून या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सध्या सुरू आहे.

हे देखील पाहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT