अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ! राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी !

रायगडाला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सुधागड तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडाला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सुधागड तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने खोपोली-वाकण या राष्ट्रीय महामार्गावरील पाली, जांभूळ पाडा येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

अंबा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने भैरव रस्ता रहदारी करता बंद करण्यात आला. तसेच जांभुळ पाडा ते कळंब, जांभुळपाडा ते माणगाव बुद्रुक रस्ता देखील रहदारीसाठी बंद केल्याची माहिती तहसीलदार रायन्नावार यांनी दिली असून प्रशासनाने नदी किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पाली व जांभुळपाडा येथे खोपोली-वाकण रोडवर अंबा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलावरून पाणी जात असल्याने पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या ठिकाणावरून येणाऱ्या प्रवाश्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरू झाला की दरवर्षी पाली व जांभुळ पाडा येथील जुन्या पुलावरून पाणी जाऊन रस्ता वाहतुकीस बंद होतो. त्यामुळे नवीन पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार आणि पावसाळ्यातील हा त्रास कधी थांबणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Edited By : Kushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी बाबूंसाठी महत्त्वाची बातमी; ४८ तासांपेक्षा जास्त वेळ तुरुंगात राहिलात तर ऑटोमॅटिक व्हाल सस्पेंड!

पत्नी नाराज असेल तर कोणते 5 संकेत दिसतात?

मोठी बातमी! मुंबई ते पुणे प्रवास आता होणार सुपरफास्ट; उन्नत मार्गाचे ६७ टक्के पूर्ण; ९० मिनिटांचा वेळ वाचवणार

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या साफसफाईचा कचरा वाढला! पुण्यात रोज ३ हजार टन कचरा; महापालिकेवर अतिरिक्त ताण

Washing machine overloading: वॉशिंग मशीनमध्ये एकावेळी किती कपडे धुणं योग्य असतं?

SCROLL FOR NEXT