Nagpur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: सर्जा राजाच्या नावावर 'रात्रीस खेळ चाले'; बंद शामियान्यात 'न्युड डान्स'

100 रुपयांमध्ये डान्स बघण्यासाठी तरुणांची गर्दी

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर- जिल्ह्यात दिवसा सर्जा-राजाची शर्यत आणि रात्र होताच बंद शामियानात ‘न्यूड डान्स’ सुरु असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यात बीभत्सपणाचा कळस गाठणारा प्रकार उमरेड तालुक्यात बघावयास मिळत आहे. रात्रीच्या अंधारात हा किळसवाणा खेळ शेकडो तरुणाईच्या उपस्थितीत सर्जा राजाच्या नावाखाली सुरू असल्याची माहिती आहे. (Nagpur Latest Cirme News)

हे देखील पहा -

कुही तालुक्यातील काही गावांमध्ये 'डान्स हंगामा' अशी जाहिरातबाजीची पत्रके भिंतीवर लावण्यात आली आहेत. कुही तालुक्यातील मुसळगाव, भुगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी या गावांमध्ये हा डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या डान्स हंगामाच्या नावावर तरुण तरुणीचा विवस्त्र डान्स सुरु होता. इतकेच नाही तर या 100 रुपयांमध्ये डान्स बघण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती.

बाम्हणी येथील ‘न्यूड डान्स’चे व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. यामध्ये दोन तरुण आणि तरुणी अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत दिसून येत आहेत. अंगावर केवळ अंतर्वस्त्र परिधान केलेल्या दोन तरुणींचा मंचावरील डान्स आणि त्यांच्या सोबत दोन तरुण असा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या न्यूड डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताच, आता काही गावांमधील पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT